By  
on  

Trailer Out: वीजचोरीच्या ज्वलंत विषयावर आहे, ‘बत्ती गुल मीटर चालू’

आजकाल सामाजिक विषयांवर बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर सिनेमे येऊ लागले आहेत. टॉयलेट एक प्रेमकथा, पॅडमॅननंतर आता वीज चोरीचा मुद्दा घेऊन ‘बत्ती गुल मीटर चालू’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शाहिद कपूर आणि श्रध्दा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच उलगडला आहे.

लाखो रुपयांचे वीजबील भरण्याची ऐपत नसल्याने तणावाखाली येऊन एक तरुण आत्महत्या करतो आणि त्यानंतर काय नाट्य उभं राहतं, याचे चित्रण सिनेमात पाहायला मिळणार असल्याचा अंदाज या ट्रेलरमधून येतो. या तरूणाला म्हणजेच आपल्या मित्राला न्याय देण्यासाठी शाहिद प्रयत्नांची कशी पराकाष्ठा करतो हे सिनेमात पाहायला रोमांचक ठरणार आहे. सिनेमाचा हा ट्रेलर प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा आहे.

https://youtu.be/BoLTSoVPzQ0

सिनेमात शाहिद कपूर, श्रध्दा कपूर यांच्यासोबतच दिव्येंदू शर्मा आणि यामी गौतम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. टी-सिरीजची निर्मिती असलेला ‘बत्ती गुल मीटर चालू’ हा सिनेमा येत्या 21 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive