By  
on  

अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ची सुवर्णभरारी; पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकल्याचे दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नावाप्रमाणेच सुवर्णभरारी घेतली आहे. ‘गोल्ड’ सिनेमा स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर प्रदर्शित झाला.

ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन ‘गोल्ड’च्या पहिल्या दिवशीच्या कमाईची माहिती दिली. या सिनेमाने 15 ऑगस्ट रोजी म्हणजे बुधवारी 25.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवल्याचे सांगितले आहे. तसंच 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या टॉप 5 सिनेमांमध्ये ‘गोल्ड’ने आपलं स्थान पटकावले आहे. या यादीत गोल्ड 3 क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर संजू, दुस-या क्रमांकावर रेस 3, तिस-या क्रमांकावर गोल्ड, चौथ्या क्रमांकावर ‘बागी 2’ आणि पाचवा क्रमांक ‘सत्‍यमेव जयते’चा आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/1029981944778346496

अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ची कथा सर्वांनाच खुप भावणारी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळ रीमा कागती यांनी फारच सहज-सुंदर पध्दतीने पडद्यावर मांडला आहे. या सिनेमातला प्रत्येक क्षण आपल्याला नवं काहीतरी देतो. देशाला पहिलं गोल्ड मेडल हॉकी टीमने स्वंतत्र भारताच्या स्वरुपात दिलं होतं, हे दिग्दर्शिकेने फारच शानदार पध्दतीने सादर केलं आहे. ब्रिटीश टीमच्या अंतर्गत कसे भारतीय खेळाडू हॉकी खेळतात व शेवटी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अभिमानाने देशाचा झेंडा कसा फडकावतात ही दृष्ये फारच हद्यस्पर्शी आहेत. आपल्या भारतासाठी हॉकी खेळण्याची खेळाडूंची उर्मी आणि जिद्द सिनेमात पाहून रोमांच उभे राहतात.

 

टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयने ‘गोल्ड’ सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. अक्षय कुमारने या सिनेमात बंगाली कोचची अप्रतिम व्यक्तिरेखा साकारुन आपण अभिनयाचे खिलाडी असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केलं आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive