By  
on  

सोनाली बेंद्रेचा मुलगा रणवीरने केली ही पोस्ट शेअर

बॉलिवूडची सुंदर आणि गुणी अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्क येथे कॅन्सरवर उपचार घेत आहे. मागील अनेक दिवसांपासून ती आपल्या या आजाराबाबतची प्रत्येक अपडेट सोशल अकाऊंटच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवत आहे. तिच्या प्रत्येक अपडेटमधून ती या गंभीर प्रसंगाला किती धैर्याने सामोरे जाते, हे दिसून येत आहे.

सोनालीचा मुलगा रणवीर आपला अभ्यास आणि शाळेमुळे आईसोबत न्यूयॉर्कमध्ये नाही. नुकताच त्याचा 13 वा वाढदिवस झाला आणि महत्त्वाचं म्हणजे प्रथमच त्याच्या वाढदिवसाला आई म्हणजे सोनाली नव्हती. यानंतर नुकतीच रणवीरने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणतो “तुम्ही सर्व माझ्यासाठी आधार म्हणून उभे आहात, याबद्दल खुप खुप धन्यवाद”

https://www.instagram.com/p/BmfnUp0Fy6I/?taken-by=rockbehl

सोनालीने रणवीरला वाढदिवसानिमित्त सोशल मिडीया अकाउंटवरुन शुभेच्छा दिल्या होत्या. अत्यंत भावूक होत सोनालीने लिहीले होते., “ रणवीर माझा मुलगा. माझा लाडला. माझं सर्वस्व…असो ठिक आहे. जरा जास्त होत असलं, तरी मला ते म्हणण्याचा हक्क आहे. आज तुझा 13 वा वाढदिवस…छान! आता तु टिनएजर झाला आहेस. तुझी मस्ती, हुशारी, तुझा द्याळूपणा, तुझी ताकद यासर्वांसाठीच मला तुझा खुप अभिमान आहे. तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा! तुला भरपूर प्रेम आणि खुप मोठी मिठी!”

सोनालीला आपल्याला कॅन्सर झाल्याची बातमी आपल्या मुलाला कशी सांगायची याची चिंता सारखी सतावत होती. सोनाली आणि तिचे पती गोल्डी बहल यांच्यासमोर आपला मुलगा रणवीरला हे कसं सांगायचं, आणि तो यावर कशी प्रतिक्रिया देईल, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पण दोघंही आई-बाबांनी मोठ्या धीराने ही परिस्थिती सावरुन घेतली. रणवीरसुध्दा समजुतदार पध्दतीने या प्रसंगाला सामोरा जातोय.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive