By  
on  

बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक: सागर देशमुख

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेत सागर देशमुख हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारत आहे. यानिमित्ताने पिपिंगमून मराठीने अभिनेता सागर देशमुखशी खास बातचीत केली. यामध्ये आंबेडकरांची भुमिका साकारताना कशाप्रकारे तयारी केली याविषयी सागरने 'पिपिंगमून मराठी'शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

 

प्रश्न: आंबेडकरांची भूमिका साकारण्यासाठी कशाप्रक्रारे अभ्यास करावा लागला?

उत्तरअभ्यास हा करावाच लागतो. त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांच्या आयुष्यावर लिहिलेली पुस्तक, त्यांचे फोटोज बघणं अशा प्रकारचा अभ्यास करावा लागतो. परंतु हेही तितकंच खरं आहे ज्यावेळेला आपण हा अभ्यास करतो तेव्हा हे सगळं सोडून जेव्हा सीन्स आपल्याकडे येतात त्यावेळी त्या सीन्सवर कसं रिऍक्ट करावं हे दिग्दर्शकाबरोबर चर्चा करून ठरवावं लागतं. आतापर्यंतचा हा प्रवास हा चांगला आहे. आणि ज्या पद्धतीने प्रेक्षकांनी हि मालिका स्वीकार केली आहे त्याबद्दल आनंद आहे.

प्रश्न: भाई आणि आंबेडकर साकारताना काय फरक जाणवला?

उत्तरभाई हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि बाबासाहेब आंबेडकर हे जगामध्ये प्रसिद्ध आहेत. घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जाते. तर खूप फरक आहे दोन्ही पात्रांमध्ये. दोन्ही पात्रांचे हावभाव, देहबोली खूप वेगळी आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकर ही मला अत्यंत आव्हानात्मक भूमिका वाटते म्हणून ती स्वीकारली.

प्रश्न: डॉ बाबासाहेब आंबेडकर या मालिकेचा मोठ्या पडद्यावर स्क्रीनिंग होऊन बाहेरगावची माणसं एकत्रित रित्या हि मालिका बघत आहेत. प्रेक्षकांच्या या प्रतिसादाबद्दल काय वाटतं?

उत्तरअशा पद्धतीचे प्रेक्षक असतील तर कुठलीही मालिका पोहोचायला किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवायला आम्हाला मदत होईल. अशा पद्धतीच्या प्रेक्षकांची आम्हाला गरज आहे. आणि ज्या प्रेक्षकांनी अशा पद्धतीने प्रतिसाद दिलाय त्यांचे मी शतशः आभार मानतो.

प्रश्न: चरित्र भूमिका करून कुठेतरी टाइपकास्ट होण्याची भीती वाटते का?

उत्तरबाबासाहेब हे वेगळे आहेत आंबेडकर हे वेगळे आहेत त्यामुळे टाइपकास्ट होण्याचा काही प्रश्न नसतो.

प्रश्न: या मालिकेविषयी तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल?

उत्तर: बाबासाहेबांचं आयुष्य लहानपणापासून ते आतापर्यंत रंजक पद्धतीने प्रामाणिकपणाने प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयन्त असणार आहे तो सर्वांनी जरूर पाहावा.

अभिनेता सागर देशमुखला या मालिकेच्या पुढील वाटचालीसाठी पिपिन्गमून मराठी तर्फे खूप शुभेच्छा. ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सोमवार ते शनिवार ९ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive