कॉलेजमध्ये प्रमुख पाहुण्यांसमोर भाषणाच्या तयारीत गुंग असलेली ईशा रिक्षा पकडून कॉलेजला निघते. जाताना वाटेत विक्रम सरंजामे तिच्याकडे लिफ्ट मागतात. ईशा त्यांच्याकडे चोवीस रुपये मागते. पण उतरताना अर्ध शेअर देण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नसतात. मग काय, ईशाला त्यांचे पैसे भरावे लागतात. धावतपळतच ती भाषण करण्यासाठी स्टेजवर जाते. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांची एन्ट्री होते. रिक्षात भेटलेले सरंजामेच कॉलेजच्या कार्यक्रमाचे पाहुणे असल्याचे पाहून ईशाला जबर धक्का बसतो. कार्यक्रमानंतर सरंजामे ईशाला एक कोरा चेक देतात. इथूनच पुढे मालिकेला वळण येतंय.
[video width="640" height="358" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/08/zeemarathiofficial_38988944_530623440691722_5556754951566262272_n.mp4"][/video]
विक्रांत सरंजामे ईशाला भेटायला तिच्या घरी पोहचतात तर तिची आई त्यांना मॅकॅनिक समजून समजून त्यांच्यावर आरडाओरड करत फ्रिज दुरूस्त करायला सांगते. सरंजामेसुध्दा मोबाईलवर व्हिडीओच्या साहाय्याने फ्रिज दुरूस्तीला सुरूवात करतात. तर इथे ईशा मिळालेला चेक परत करण्यासाठी सरंजामे यांच्या ऑफिसमध्ये येते.चेक परत करताना ती जो लिफाफा देते त्यात चेकच नसतो. या कारणावरून सरंजामे यांची सेक्रेटरी ईशाला घालून-पाडून बोलते आणि तिचा अपमान करून बाहेर तिला बाहेर काढते. पुढे नेमकं काय घडतं, ईशा आणि विक्रांत सरंजामे पुन्हा भेटतात का आणि भेटतात तर मग कसे, हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा, झी मराठीवर ‘तुला पाहता रे’ सोम.ते शनि. रात्री 8.00वा.