देसी गर्ल बनणार मिसेस जोनास, निकने करुन दिली भावी पत्नीची ओळख

By  
on  

बॉलिवूडची देसी गर्ल आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचे नाते अखेर अधिकृत करण्यात आले त्यांच्या साखरपुड्याच्या यापूर्वी आलेल्या उलट-सुलट चर्चांना अखेर आज पूर्णविराम मिळाला. शनिवारी सकाळी प्रियंकाच्या मुंबईतील जुहू येथील निवासस्थानी पारंपारिक हिंदू रोका पध्दतीने प्रियंका आणि निकचा साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला.

https://www.instagram.com/p/BmnZzOogQ2e/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_loading_state_control

प्रियंकाने निकसोबचा एक सुरेख फोटो इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. तिने कॅप्शनसुध्दा दिलंय, प्रियंका चोप्रा जरी विदेशी मुलासोबत विवाहबध्द होत असली तरी हद्याने ती एक देसी गर्लच आहे, आणि याचाच पुरावा आपल्याला आज तिच्या घरी पारंपारिक हिंदू पध्दतीने झालेल्या साखरपुड्यावरुन मिळाला. प्रियंकाची आई मधू चोप्राने औक्षण करत यावेळी जावई निक आणि त्याच्या आई-वडिलांचे स्वागत केले.

https://www.instagram.com/p/BmnZzXIF1KJ/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_loading_state_control

निकनेसुध्दा आपल्या जगभरातील चाहत्यांना भावी मिसेस जोनास यांची ओळख इंस्टाग्रामवरुन करुन दिली.

या खास निमित्ताने प्रियंकाने शानदार पार्टीचे आयोजन केल्याचे बोलले जात आहे. या पार्टीत प्रियंकाचे जवळचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना निमंत्रित करण्यात आले आहे. या पार्टीत प्रियंका आणि निक वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसतील अशी चर्चा आहे. सकाळी दोघेही भारतीय पोशाखात पाहायला मिळाले होते. तसंच पार्टीत कॉन्टीन्टेल मेनूबरोबरच भारतीय पदार्थ आणि खास करुन पंजाबी पदार्थ पाहुण्यांसाठी सर्व्ह केले जातील.

बॉलिवूडसह तमाम चाहत्यांना या शानदार पार्टीच्या अपडेट्सची उत्सुकता लागून राहिली आहे.

Recommended

Loading...
Share