पाहुण्यांच्या स्वागतासाठी प्रियंकाची आई सज्ज

By  
on  

लेक प्रियंका आणि विदेशी जावई निक जोनास यांचा पारंपारिक पध्दतीने साखरपुडा पार पडल्यानंतर आज रात्री सुरू होणा-या शानदार पार्टीसाठी चोप्रा कुटुंबिय सज्ज झाले आहेत. प्रियंकाची आई मधू चोप्रा लेकीच्या पार्टीत पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी खास सज्ज झाल्या आहेत. नुकतेच पार्टीच्या ठिकाणी त्यांचे आगमन झाले.

पाहुण्यांच्या सरबराईत कोणतीही कसर कमी पडू नये म्हणून मधू चोप्रा सर्वच ठिकाणी विशेष लक्ष देत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

या पार्टीत प्रियंकाचे जवळचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना निमंत्रित आले आहे. या पार्टीत प्रियंका आणि निक वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसतील अशी चर्चा आहे. सकाळी दोघेही भारतीय पोशाखात पाहायला मिळाले होते. तसंच पार्टीत कॉन्टीन्टेल मेनूबरोबरच भारतीय पदार्थ आणि खास करुन पंजाबी पदार्थ पाहुण्यांसाठी सर्व्ह केले जातील.

बॉलिवूडसह तमाम चाहत्यांना या शानदार पार्टीच्या अपडेट्सची उत्सुकता लागून राहिली आहे.

Recommended

Loading...
Share