प्रियंका-निकच्या पार्टीसाठी सुरू झाली सेलिब्रिटींची लगबग

By  
on  

देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांचा आज पारंपारिक हिंदू पध्दतीने रोका विधी थाटात पार पडल्यानंतर आज रात्रीच्या त्यांच्या साखरपुड्याच्या शानदार पार्टीला सुरूवात झाली आहे. निक कुटुंबिय, जवळचे नातेवाईक आणि बॉलिवूडमधले प्रियंकाचे सर्व मित्र आणि सेलिब्रिटींना या खास पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळेच अनेक सेलिब्रिटींनी आता पार्टीच्या ठिकाणी हजेरी लावायला सुरुवात केली आहे.

 

 

अंबानी कुटुंबिय पार्टीसाठी हजर आहेत

 

 

आलिया भटचा बेधडक अंदाज

 

प्रियंकाचे लाडके दिग्दर्शक आणि मित्र संजय लीला भन्साळी

लव्हरात्री स्टार आयुष शर्मा

सलमान नसला तरी भाईजानची बहिण अर्पिता खान शर्मा पार्टीसाठी हजर आहे

 

या पार्टीत प्रियंका आणि निक वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसतील अशी चर्चा आहे. सकाळी दोघेही भारतीय पोशाखात पाहायला मिळाले होते. त्यामुळे सर्वांनाच त्यांच्या पार्टीतील पेहरावाची प्रचंड अातुरता आहे. तसंच पार्टीत कॉन्टीन्टेल मेनूबरोबरच भारतीय पदार्थ आणि खास करुन पंजाबी पदार्थ पाहुण्यांसाठी सर्व्ह केले जातील.

बॉलिवूडसह तमाम चाहत्यांना या शानदार पार्टीच्या अपडेट्सची उत्सुकता लागून राहिली आहे.

 

 

Recommended

Loading...
Share