By  
on  

चाहत्यांनी अनुभवला दुग्धशर्करा योग!

प्रेक्षकांना नुकताच एक दुग्धशर्करा योग अनुभवायला मिळाला. बॉलिवूड गाजवणा-या दोन सौदर्यंवती अभिनेत्री माधुरी दिक्षीत आणि काजोल यांना एकाच मंचावर अनेक दिवसानंतर पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांच्या आनंदाला उधाण आले. आपला आगामी सिनेमा ‘हेलिकॉप्टर ईला’च्या प्रमोशन निमित्ताने काजोलने डान्स रिएलिटी शो ‘डान्स दिवाने’च्या मंचावर हजेरी लावली. महत्त्वाचं म्हणजे या शोच्या परिक्षणाची जबाबदारी धकधक गर्ल माधुरीवर आहे. हे दोन आश्चर्याचे धक्के मिळाल्यानंतर तिसरा धक्का होता तो, ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना मंचावर याचवेळी एकत्र पाहण्याचा.

या शोमध्ये ‘हेलिकॉप्टर ईला’च्या लूकमध्येच काजोल दिसून आली. तर माधुरीने खुपच सुंदर अशी हलक्या रंगाची साडी परिधान केली होती,ज्यात तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत होतं. आशाताईंची तर बातच न्यारी! त्या नेहमीप्रमाणेच आपल्या हटके अंदाजात आणि सुरेल गाण्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध करत होत्या. तर काजोल कार्यक्रमातील स्पर्धकांना त्यांच्या परफॉर्मन्सनंतर मनमुराद दाद देत होती.

https://www.instagram.com/p/Bm-ml6IHl3M/?taken-by=peepingmoon

आशाताईंनी या कार्यक्रमाच्या मैफिलीत रंग भरल्यानंतर काजोल आणि माधुरी भारावून जात अगदी सामान्य चाहत्यांप्रमाणे त्यांना आपल्या कॅमे-यात कैद करत होत्या. या दिग्गजांना एकत्र पाहणं, ही चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच ठरली.

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive