मालिकांच्या स्पर्धेत विणूया अतूट नाती म्हणत दमदार पदार्पण कराणारी सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमांबद्दल फार अल्पावधीतच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागाल आहे. सोनी मराठीची ‘ह.म.बने तु.म.बने ही कौटुंबिक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय.
दोन बायका एकत्र आल्या की त्यांच्यात वाद हे होतातच. आजवर अनेकदा सासू-सुनेच नातं विविध पैलूंद्वारे मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु सोनी मराठीने ‘ह.म.बने तु.म.बने या मालिकेद्वारे एक नाही, दोन नाही तर तीन-तीन स्त्रियांच्या भिन्नदृष्टीकोनवर आधारित तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यातलं नाट्य हलक्या फुलक्या नर्मविनोदी शैलीत मांडलं आहे. प्रेक्षकांना एक नवीन दृष्टिकोन देत, मनोरंजन क्षेत्रामध्ये एक नवीन पायंडा रुजू करत आहे.
सोशल मीडियासारख्या प्लॅटफॉर्मवरून आजकाल प्रेक्षक व चॅनल यांमधील अंतर कमी होऊन प्रेक्षक आपली मते, आपली आवड निवड डायरेक्ट चॅनल, तसेच कलाकारांपर्यंत पोहोचविण्यास खूप प्राधान्य देत असल्याचे ‘ह.म.बने तु.म.बने’मालिकेला सोशल मीडियावर आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून लक्षात येते.
आदिती सारंगधर, राणी गुणाजी, प्रदीप वेलणकर, उज्वला जोग, सचिन देशपांडे, अजिंक्य जोशी, यांसारख्या मात्त्तबर कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या आणि केदार आगास्कर, सखी दातार, पूर्वी शाह या बच्चे कंपनीने आणलेल्या धमाल मस्तीमुळे या मालिकेला मिळालेल्या प्रेक्षकांच्या भरगोस प्रतिसादांमुळे ‘ह.म.बनेतु.म.बने मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतं असल्याचे दिसून येते आहे.
सोनी मराठीच्या ‘विणूया अतूट नाती’ह्या आपल्या मूळविचाराशी एकनिष्ठ राहत ‘ह.म.बनेतु.म.बने’ही मालिका दिग्दर्शन सचिन गोखले करत असूनही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करू लागली आहे. या मालिकेतील आणखीन गमती-जमती आणि मनोरंजन अनुभवण्यासाठी ‘ह.म.बने तु.म.बने’पाहत राहा, सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता. नवीन वाहिनी, सोनी मराठीवर.