By  
on  

‘सविता दामोदर परांजपे’ने तीन दिवसांत कमावला एक कोटींचा गल्ला

सविता दामोदर परांजपे या गाजलेल्या नाटकावर आधारित असलेल्या सविता दामोदर परांजपे या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालाय. बऱ्याच दिवसांनंतर एक उत्तम थरारपट पाहिल्याचा अनुभव प्रेक्षकांनी घेतल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.

80 चे दशक गाजविलेले ‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक सिनेमा रुपात पहाण्याची उत्सुकता अनेकांना होती. हे माध्यमांतर उत्तम झाल्याचे मान्यवरांचे मत आहे. शुक्रवारी या चित्रपटाने 21 लाख, शनिवारी 34 लाख तर रविवारी 52 लाखांची कमाई केली. एकूण या तीन दिवसांत सिनेमाने एक कोटी उत्पन्नाचा टप्पा ओलांडला आहे.

 

अभिनेता जॉन अब्राहम यांची पहिली मराठी सिनेमा निर्मिती असलेल्या सिनेमाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे- जोशी यांनी केलं आहे. या चित्रपटात सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका ‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive