शाहिद आणि मीरा पुन्हा आई-बाबा, मीराने दिला गोंडस मुलाला जन्म

By  
on  

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत पुन्हा एकदा आई बाबा झाले आहेत. मीराने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. बुधवारी संध्याकाळी मीराला प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिला हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोघांनाही पहिली मीशा नावची मुलगी आहे. मिशा आता दोन वर्षांची असून दोघांनीसुध्दा तिचं नाव स्वत:च्या आद्याक्षरावरुन ठेवलं होतं, त्यामुळे आता या आगमन झालेल्या नवीन पाहुण्याचं नाव काय ठेवण्यात येणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

मीराची प्रसूती जवळ आल्याने शाहिदने त्याची सर्व नियोजित चित्रिकरण रद्द केले होते. मीराची आई बेला, शाहिद कपूरचे वडील पंकज कपूर, भाऊ ईशान खत्तर यावेळी रूग्णालयात उपस्थित होते. शाहिदसुध्दा सध्या पालकत्त्वाच्या रजेवर असून तो नवीन पाहुण्याची आणि मीराची काळजी घेणार असल्याचे कळते. संपूर्ण बॉलिवूडमधून आता शाहिद आणि मीरावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

Recommended

Loading...
Share