By  
on  

शाहिद-मीराने मुलाचे ठेवले हे हटके नाव

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांना 5 सप्टेंबरला एक गोंडस मुलगा झाला. सिनेइंडस्ट्री आणि चाहत्यांकडून दोघांवर या गोड बातमीसाठी शुभेच्छांचा प्रचंड वर्षाव झाला. दोघांना मीशा नावाची दोन वर्षाची पहिली मुलगी आहे. तिचा जन्म झाल्यावर शाहिदच्या नावातील आद्याक्षर शा आणि मीराच्या नावातील मी यांवरुन दोघांनी तिचं नामकरण केलं. त्यामुळे आता ज्युनियर कपूरचं नाव हे कपूर दाम्पत्य काय ठेवणार याबाबत खुप चर्चा आणि उत्सुकता रंगली होती. अनेकांनी तर ट्विट करून त्यांना विविध व भन्नाट नाव सुचवून धम्माल उडवून दिली. पण आता शाहिदनेच त्याच्या मुलाच्या नावाचा उलगडा अखेर केला आहे.

शाहिदने घरी आगमन झालेल्या छोट्या पाहुण्याचं झेन असं ज्युनियर कपूरचं नामकरण केलं आहे. मीशा आणि झेन ही त्याची बच्चेकंपनी आहेत.

https://twitter.com/shahidkapoor/status/1037997278387163138

 

शाहिदने ट्विट करत सर्वांना ही आनंदाची बातमी दिली झेन कपूरमुळे आम्हाला पूर्ण झालो आहोत. तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छांसाठी खुप खुप धन्यवाद. सर्वांना माझ्याकडून भरपूर प्रेम. दरम्यान शाहिद कपूरचं ट्विटर अकाऊंटसुध्दा हॅक झालं होतं. हॅकर्स त्याच्या अकाऊंटवरुन अनेक चित्र-विचित्र ट्विट करत होते. कतरिना कैफचा फोटो पोस्ट करत हॅकर्सने तिला आय लव्ह यूसुध्दा म्हटलं.

Recommended

PeepingMoon Exclusive