By  
on  

पाहा व्हिडीओ : प्रियंका आणि दिपीकाने धरला माझ्या नव-याची बायकोवर ताल

 

बॉलिवूडची मस्तानी आणि काशीबाईंनी जर पिंगा ऐवजी माझ्या नव-याची बायको या गाण्यावर ताल धरला तर......ऐकूनच हसू फुटलं ना...पण हे असं खरंच झालं आहे...प्रत्यक्ष नाही तर सोशल मिडीयावर...या दोघींना पिंगा नाही तर माझ्या   नव-याची बायको या झी टीव्हीवरच्या धम्माल टायटल सॉंगवर नाचताना पाहायला मिळतेय. एका पेसबुक पेजवर कोणीतरी पिंगा हे गाणे एडिट करुन माझ्य नव-याची बायको या चालीवर अचूक बसवल्याने व्हिवर्सची प्रचंड पसंती पिंगा - माझ्या नव-याची बायकोला मिळतेय. शनाया आणि राधिकाच्या

https://youtu.be/61aM6zHFIJE

 

बाजीराव मस्तानी या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या सिनेमात मस्तानीची भूमिका दिपीका पदुकोणने तर काशीबाईची भूमिका प्रियंका चोप्राने साकारलीय. हे गाणं जेव्हा मस्तानी आणि काशीबाईची सिनेमातील कथानकानुसार भेट होते तेव्हा चित्रित करण्यात आलं आहे. पण प्रियंकाा दिपीकाला माझ्या नव-याची बायको टायटल सॉंगवर नाचताना धम्माल मजा येते. अनेक यूजर्सनी तर यूट्यूबवर कमेंटमध्ये हे सॉंग खुप पसंत पडल्याची पावती ते तयार करणा-यांना दिली आहे.

आजकाल सोशल मिडीयावर कल्पनाशक्तीला प्रचंड वाव मिळतो. कधी कोण कोणाला ट्रोल करेल याचा नेम नाही. याची प्रचिती आपल्याला नेहमी व्हायरल होणा-या मिम्स आणि व्हिडीओवरुन येतच असते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive