मराठीत अनेक नवनवीन विषयांवर सिनेमे येत असतात. त्यातील काही ज्वलंत विषयांवर सिनेमे पण तयार होऊ शकताता याची आपल्याला जरासुध्दा कल्पना नसते. मी शिवाजी पार्क असं आगळं वेगळं नाव असलेला सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रसिध्द दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे या सिनेमात दिग्गज कलाकारांची मांदियाळी प्रेक्षकांना प्रथमच एकत्रच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा सिनेमा एकप्रकारची पर्वणीच ठरणार आहे.
दिलीप प्रभावळकर, शिवाजी साटम, अशोक सराफ, सतीश आळेकर आणि विक्रम गोखले अशी तगडी स्टारकास्ट मी शिवाजी पार्क सिनेमाला लाभली हे. न्यायदेवता आंधळी असते.....आम्ही डोळस होतो अशी या सिनेमाची टॅगलाईन असल्याने एखाद्या गंभीर प्रश्नावर न्यायनिवाडा करण्यासाठी न्यायालयाचा प्रसंग सिनेमात उभा करण्यात येणार असल्याचा अंदाज येतो आहे.
दिलीप साहेबराव यादव आणि सिद्धार्थ केवलचंद जैन यांची निर्मिती असलेला आणि गौरी पिक्चर प्रोडक्शन अंतर्गत तयार झालेला मी शिवाजी पार्क हा सिनेमा येत्या 18 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
सर्वांनाच या सिनेमाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.