ईशा आणि विक्रांत सरंजामे देणार का आपल्या प्रेमाची कबुली?

By  
on  

अनेक दिवस ईशा आणि विक्रांत सरंजामेंच्या मनाची घालमेल सुरु आहे. सरंजामे ईशावर नकळत प्रेम करतायत पण त्याचं त्यांना समजत नाही. ईशा सरांजमेंच्या प्रेमात आकंठ बुडालीय. त्यांच्याशीच लग्न करण्याचा निर्णय तिच्या मनाने पक्का केला आहे. सरंजामे मात्र तिच्या भल्यासाठी तिला घरच्यांनी ठरवलेल्या मुलासोबत लग्न करण्याचा सल्ला देतात. पण दोघांपैकी एकही जण आपल्या प्रेमाची कबुली एकमेकांना देत नाहीत. इथेच गाडं अडतंय.

मध्यवर्गीय ईशा चाळीत राहते तर मोठ्या कंपन्यांचे मालक असलेले विक्रांत सरंजामे आलिशान बंगल्यात राहतात. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ईशा सध्या दडपणाखाली आहे. ईशाच्या वडिलांचं साड्यांचं दुकान पैशाअभावी गहाण आहे. त्यामुळे ईशाची आई या अडचणीतून सोडवण्याचे आश्वासन देणा-या टिल्लू परिवारातील बिपीन टिल्लूसोबत ईशाचं लग्न लावून देण्याचा तिच्या वडिलांकडे तगादा लावते आहे. निमकर कुटुंब आता येणा-या प्रत्येक प्रसंगाला कसं सामोरं जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

म्हणूनच ईशा आणि बिपीनचं लग्न होणार का किंवा ईशा व विक्रांत सरंजामे हे एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली कधी देणार? ईशाच्या वडिलांना तिला सरंजामे आवडतात हे कळल्यावर त्यांची कशी प्रतिक्रिया असणार ते या प्रेमाला मान्यता देणार का या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहात राहा, एका अनोख्या प्रेमाची कहाणी ‘तुला पाहते रे’ झी मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री 8.00 वा

https://twitter.com/zeemarathi/status/1042432626949349376

 

Recommended

Loading...
Share