By  
on  

सुखाच्या सरींनी सुरु झालीय शशांक-मृणालची लव्ह स्टोरी 'हे मन बावरे'

अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि अभिनेता शशांक केतकर हे सुखाच्या सरींनी 'हे मन बावरे' या कलर्स मराठीवर नुकत्याच सुरु झालेल्या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच एकत्र झळकतायत. प्रेम ही सुखद भावना असते. त्याला ना वयाचं बंधन असतं ना गरिबी-श्रीमंतीचं. अशीच एक प्रेक्षकांनासुध्दा प्रेमात पाडणारी ही प्रेमकथा येत्या 9 ऑक्टोबरपासून अनुभवता येतेय.

'हे मन बावरे' या मालिकेत यापूर्वी कलर्स वाहिनीवरच जुई म्हणून प्रेक्षकांचं मनं जिंकणारी मृणाल दुसानीस अनुची तर सिद्धार्थची भूमिका अभिनेता शशांक केतकर साकारतोय. तसंच या मालिकेत वंदना गुप्ते, प्रदीप पटवर्धन, नयना आपटे, शर्मिष्ठा राऊत हे प्रतिभावान कलाकारसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळतायत.

https://twitter.com/ColorsMarathi/status/1047013325454872577

मध्यमवर्ग कुटुंबामधली अनुश्री ही अत्यंत स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी आहे, जिचं आपल्या कुटुंबावर जीवापाड प्रेमं आहे. कोणाच्याही उपकाराच्या ओझ्याखाली दबण्यापेक्षा तिला ताठ मानेने जगायला आवडतं. तर दुसरीकडे सिध्दार्थ हा गडगंज पैसा आणि मालमत्ता असलेल्या कुटुंबातला एखाद्या राजकुमाराप्रमाणेच वाढलेला मुलगा आहे. अनु आणि सिध्दार्थचं भावविश्व खूप वेगळं आहे. ही दोन ध्रुवांवरची दोन टोकं जेव्हा एकत्र येतील तेव्हा नेमकं काय घडणार, ते कसे एकमेकांच्या प्रेमात पडणार, त्यांची प्रेमकथा कशी फुलणार आणि सिध्दार्थसोबत शुभमंगल झाल्यावर अनु तेथील वातावरणाशी जुळवून घेणार हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहात राहा सुखाच्या सरींनी 'हे मन बावरे' कलर्स मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री 8.00 वा.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive