अभिनेता आणि रंगकर्मी अशी ओळख असलेला युवा कलाकार आलोक राजवाडे लवकरच दिग्दर्शनात पदार्पण करतोय. 'अश्लील उद्योग मंडळ' असं तो दिग्दर्शन करत असलेल्या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक आलोकनेच नुकताच आपल्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या या सिनेमाची अधिकृत निवड मुंबई फिल्म फेस्टिव्हल 2018 साठी करण्यात आली आहे.
'अश्लील उद्योग मंडळ', असं हटके आणि उत्सुकता निर्माण करणारं शिर्षक असलेल्या या सिनेमात अभिनेता अभय महाजन प्रमुख भूमिकेत आहे. तसंच सई ताम्हणकर, ईशा केसकर आणि आलोकची पत्नी अभिनेत्री पर्ण पेठे महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
आलोक राजवाडे बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांसाठी पुन्हा काहीतरी नवीन घेऊन येत असल्याचं दिसून येत आहे. या सिनेमाची कथा धर्माधिकारी सुमंत यांनी लिहीली आहे.
https://www.instagram.com/p/BpBdllwH3J3/?taken-by=alokrajwade
दरम्यान, आलोकने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'विहीर', 'राजवाडे अॅण्ड सन्स', 'कासव' अशा अनेक सिनेमांमधून आलोकच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळालीय. अनेक सिनेमे आणि नाटकांमधून आपली छाप पाडणारा युवा आणि हरहुन्नरी अभिनेता आलोक राजवाडेच्या अश्लील उद्योग मंडळ या आगामी सिनेमाची प्रचंड आतुरता लागून राहिली आहे.