By  
on  

'धुरळा' Trailer: ‘कर लेका राडा’ म्हणत घुमणार नवं राजकारण

राजकारणात सत्तेसाठी काहीही करण्याची अनेकांची तयारी असते. सत्तासुंदरीला मिळवायला सारेच उत्सुक असतात. पण तिची कृपा मात्र कोणावर होईल सांगता येत नाही. क्षितीज पटवर्धन लिखीत आणि  समीर विद्वांस दिग्दर्शित ‘धुरळा’च्या ट्रेलरमध्ये नेमकं हेच तर दाखवलं आहे. मल्टीस्टारर धुरळा सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात पार पाडला. ओपन जीप मधून एका राजकीय नेत्याप्रमाणे आलेल्या कलाकारांनी उपस्थित प्रेक्षकांची मन जिंकलं. धुरळाच्या निमित्ताने कालाकारांनी ख-या अर्थाने ‘मन की बात’ चाहत्यांशी शेअर केली. 

राजकारणाभोवती गुरफटलेल्या कुटुंबाची गोष्ट धुरळामध्ये दिसून येते. एका पाठोपाठ एक घरातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर काय घडतं याचा अंदाज ट्रेलरमध्ये येतो. 

या सिनेमात सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, प्रसाद ओक, अलका कुबल, अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी,  आदी मराठी इंडस्ट्रीतले लोकप्रिय कलाकार एकत्र झळकणार आहेत. प्रत्येकाचे लुक्स एकदम हटके आणि रावडी असलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ‘हव्वा कुणाची रं, हव्वा आपलीच रं’…. ही टॅगलाईन सिनेमाला शोभून दिसते.  'धुरळा' हा मल्टिस्टारर सिनेमा 3 जानेवारी 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पाहा ट्रेलर

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive