ही आहे 'येरे येरे पैसा 2' ची स्टारकास्ट

By  
on  

पोश्टर गर्लच्या सुपरहिट यशानंतर लेखक- दिग्दर्शक हेमंत ढोमे आता कोणता पुढील प्रोजेक्ट घेऊन येणार याबाबत सर्वांनाच प्रचंड उत्सुकता आहे. मध्यंतरी त्याचा प्रदर्शित झालेल्या बघतोस काय मुजरा कर या सिनेमातचंसुध्दा बरंच कौतुक झालं. लवकरच हेमंत एका सुपरहिट कॉमेडी सिनेमाचा सिक्वल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

येरे येरे पैसा या उमेश कामत, सिध्दार्थ जाधव आणि तेजस्विनी पंडित यांच्या अभिनयाने सजलेला या सुपरहिट कॉमेडी सिनेमाने अनेक पुरस्कारांवर नाव कोरले. लवकरच या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.पण महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शन संजय जाधव नाही तर येरे येरे पैसा 2 सिनेमाचं दिग्दर्शन हेमंत करतोय.याबाबत हेमंतनेच ट्विट करत या सिक्वेलची माहिती दिली होती. या सिनेमाच्या चित्रिकरणालासुध्दा सुरुवात झालीय. पण महत्त्वाचं म्हणजे या सिनेमात कोणते कलाकार भूमिका साकरणार याबाबत प्रचंड उत्सुकता होती.

पण अभिनेता प्रसाद ओकने आपल्या सोशल अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करत याबाबतचा उलगडा केला आहे. प्रसाद ओक, अनिकेत विश्वासराव, आनंद इंगळे,मृण्मयी गोडबोले आणि हेमंत ढोमे  यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केल्याने या येरे येरे पैसा २ च्या स्टारकास्टची कल्पना येतेय. परदेशातील पार्श्वभूमीवर हा फोटो क्लिक करण्यात आल्याने हा सिनेमात परदेशात चित्रित करण्यात येत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

https://twitter.com/hemantdhome21/status/1048942920949293056

येरे येरे पैसा 2 चं लेखन ऋषीकेश कोळी यांनी केलं असून अमेय खोपकर, पर्पल बुल एंटरटेंन्मेन्ट आणि ट्रान्स फॅक्स स्टुडिओज या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे.

Recommended

Loading...
Share