By  
on  

‘मी शिवाजी पार्क’ आता जर्मनी, स्वीडन आणि अमेरिकेतही

महाराष्ट्रात मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर ‘मी शिवाजी पार्क’ हा मराठी चित्रपट आता परदेशात प्रदर्शित होणार आहे. दर्जेदार आशयाने परिपूर्ण असलेला हा चित्रपट परदेशातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. १८ ऑक्टोबरला महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आता परदेशातही आपली घौडदौड सुरु केली आहे.

येत्या १ नोव्हेंबरला जर्मनीतील म्युनिच मध्ये तर शनिवार ३ नोव्हेंबरला स्वीडनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.शुक्रवार २ नोव्हेंबर आणि शनिवार ३ नोव्हेंबरपासून मी शिवाजी पार्क अमेरिकेतील न्यू जर्सी, डल्लास, बे एरिया, फिलाल्डेफिया, पोर्टलॅण्ड, सियाटेल, अटलांटा, हॉस्टन या शहरांतील चित्रपटगृहांतून प्रदर्शित होणार आहे. आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रकाशझोत टाकणारा ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट आहे. मराठीतील पाच दिग्गज कलाकार आणि तितकेच ताकदीचे दिग्गज दिग्दर्शक यांच्या एकत्रित प्रयत्नातून साकारलेला चित्रपट परदेशातील प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

‘गौरी पिक्चर्स प्रोडक्शन’ व ‘महेश मांजरेकर मूव्हीज’च्या ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटात विक्रम गोखले, सतीश आळेकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर या दिग्गजांच्या जोडीला उदय टिकेकर, शरद पोंक्षे, सुहास जोशी, भारती आचरेकर, सविता मालपेकर, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिप्ती लेले, मंजिरी फडणीस, दिप्ती धोत्रे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

या चित्रपटाची कथा-पटकथा, दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे आहे. तर संवाद अभिराम भडकमकर यांनी लिहिले आहेत. छायांकन करण रावत यांचे असून संकलन सर्वेश परब यांनी केले आहे. या सिनेमाची निर्मिती दिलीपदादा साहेबराव यादव व सिद्धार्थ केवलचंद जैन यांची असून, मंगेश रामचंद्र जगताप, शंकर रामेश्वर मिटकरी, भरत छगनलाल राठोड, मिलिंद सीताराम वस्ते या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive