संजय जाधव ठरले लकी अन् सईच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू

By  
on  

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि फिल्ममेकर संजय जाधव एकत्र आले की सुपहिट फिल्म पाहायला मिळणार, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालंय. फिल्ममेकर-हिरोईनची ही जोडी सिनेमाक्षेत्रातच नाही तर खेळाच्या मैदानावरही हिट आहे, हे सध्या सुरू असलेल्या कुस्ती दंगलमध्ये पुन्हा एकदा सिध्द झालं.

सोमवारी संजय जाधव ह्यांच्यासह सई ताम्हणकरची संपूर्ण टीम बालेवाडीमध्ये कोल्हापूर मावळे विरूध्द वीर मराठवाडा मॅचसाठी उपस्थित होती आणि सईच्या कोल्हापूर मावेळ टीमला 4-2 अशा गुणांसह घवघवीत यश मिळाले. गेल्या काही दिवसांमधल्या मॅचेसमध्ये सोमवारी झालेली कोल्हापूर मावळेची लढत सर्वाधिक चुरशीची होती. टीम जिंकताच सईच्या डोळ्यांत आनंदाश्रु तरळले.

आपली टीम ‘कोल्हापूर मावळे’ सोबत आनंद साजरा केल्यावर उत्साहात असलेली सई ताम्हणकर म्हणाली, “आजपर्यंत कुस्ती दंगलमध्ये झालेल्या सर्व लढतींपैकी सोमवारची लढत ही सर्वाधिक चुरशीची आणि मनोरंजक लढत होती. शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या टीमच्या कुस्तीवीरांनी समोरच्या खेळाडूला मात देऊन यश मिळवलं. संजयदादा पहिल्यांदाच मॅच पाहायला आला आणि आम्ही मॅच जिंकलो. मी नेहमी म्हणते, दादा माझा लकीचार्म आहे. पुन्हा एकदा सिध्द झालं संजय दादा माझ्यासाठी लकी आहे.”

सई मिश्किलपणे संजय जाधव ह्यांच्याकडे पाहत पुढे म्हणाली, “आता मला जिंकवायला संजयदादाला प्रत्येक मॅचसाठी यावंच लागणार. ”

पाहा व्हिडीओ

कोल्हापुरी मावळे जिंकल्यावर सईला आनंदाश्रू आवरता आले नाहीत

[video width="480" height="480" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/11/WhatsApp-Video-2018-11-13-at-1.09.38-PM.mp4"][/video]

Recommended

Share