By  
on  

अभिनेत्री अलका कुबल सााकारणार काळूबाई

मराठी सिनेसृष्टीत आपल्या सशक्त अभिनयाचा ठसा उमटवून दर्जेदार सिनेमे देणा-या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. अजूनही त्यांचा उत्साह वाखाणण्या जोगा आहे. त्यातही त्या रसिकांना वैविध्य देताना पाहायला मिळतात.

 एकीकडे विनोदी रिएलिटी शोचं परिक्षण करुन स्वत:चीच चौकट मोडू पाहतात तर दुसरीकडे राजकीय लालसेपोटी सशक्त अभिनय साकारत धुरळा उडवून देतात. आता लवकरच अलकाताई एका नव्या भूमिकेतून छोट्या पडद्यावर रसिकांच्या भेटीला येत आहेत.

‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ असं लिहित अलका यांनी हा टीझर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका लवकरच सुरू होणार आहे.  अलका कुबल देवी काळूबाईच्या रुपात या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. 

अलका यांनी याआधीही पौराणिक कथानक असलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या देवी काळूबाईच्या  या भूमिकेलाही प्रेक्षक उत्सफूर्त प्रतिसाद देतील यात शंका नाही. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive