नेहमीच आपल्या मनमोहक अदांनी रसिकांना घायाळ करणारी मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी आपल्याला सध्या एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी प्रेरित करतेय. तुम्ही म्हणाल कशाबद्दल म्हणताय तुम्ही, म्हणजे नक्की काय सांगायचंय तुम्हाला?
मराठीतील सुंदर व बोल्ड अभिनेत्रींमध्ये सोनालीचा क्रमांक टॉपवर आहे. नुकताच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन वर्कआऊट करतानाचा एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे.या व्हिडीओद्वारे ती चाहत्यांना परफेक्ट फिटनेस गोल्स देतेय. यात वर्कआऊटचे विविध प्रकार करताना ती आपल्याला पाहायला मिळतेय.सोनाली फिटनेस फ्रीक आहे.
नेहमी स्ली-फिट दिसणा-या सोनालीने हे रहस्य खुद्द स्वत:च उलगडलं आहे. वर्कआऊट करतानासुध्दा ती फारच बोल्ड आणि ब्युटिफूल दिसतेय. नेहमीच ग्लॅमरस अवतारात वावरणा-या सोनालीचं फिटनेसवरचं हे प्रेम लय भारी!
https://www.instagram.com/p/BqO1ihpl4xl/
दिवाळी नुकतीच संपलीय आणि गोड-धोड खाऊन आपलं वजन नक्कीच वाढलं असणार,त्यामुळे सोनालीचा हा व्हिडीओ आपल्याला प्रेरित करण्यात कसलीच कसर सोडत नाहीय.