By  
on  

अभिनेत्री सई ताम्हणकरचा मोबाईल फोन हरवला आणि.......

सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री सई ताम्हणकर हिला सध्या एका मनस्तापातून जावं लागतंय. तुम्ही म्हणाल मनस्ताप कसला आणि कशामुळे. अहो, तर त्याचं असं झालंय की, सईबाईंचा फोन अचानक हरवलाय आणि ज्या कोणा व्यक्तीने तो घेतलाय तो त्यावरुन सईच्या सोशल अकाऊंट्सवरुन उलट-सुलट पोस्ट व मेसेजेस पाठवत सुटलाय. त्यामुळे प्रचंड हैराण झालीय.

सईने सर्वांना ट्विटरवरुन सर्वांना आवाहन केलंय की कोणीही या चुकीच्या मेसेजेसमुळे गैरसमज करून घेऊ नये. मी लवकरच या सर्व गोष्टी लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करतेय. तसंच तिने सर्व पासवर्ड चेंज केले असून ट्विटर फक्त हॅक झालं आहे. कोणालाही या संदर्भात काही अधिक माहिती मिळाल्यास तिच्यासोबत संपर्क करण्याची तिने कळकळीची विनंती केली आहे.

 

https://twitter.com/SaieTamhankar/status/1065120879749865473

https://twitter.com/SaieTamhankar/status/1065142134808948739

 

 

https://twitter.com/SaieTamhankar/status/1065142833139597312

दरम्यान, अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच डेट विथ सई ह्या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.ह्या वेबसीरिजशी निगडीत सूत्रांच्या अनुसार, ही एक थरार मालिका असणार आहे. ह्यामध्ये सई स्वत:च्याच म्हणजेच सई ताम्हणकरच्याच भूमिकेत असेल. सईचा वेडसर फॅन तिचा पाठलाग करत असतो. जो सईच्या नेहमीच नकळत अवतीभोवती असतो मग, काय आणि कसं थरारक नाट्य घडतं हे यात पाहायला मिळणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive