By  
on  

घरात बसून पुस्तकं वाचतेय, कुकिंग करतेय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, नियमांचं पालन करा आणि सहकार्य करा – सोनाली कुलकर्णी  

कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी राज्य सरकारने विविध सुचना दिल्या आहेत. याविषयी लोकांना आणखी जागरुक करण्याचं आवाहन कलाकार मंडळीही करत आहेत. हिंदी कलाकारांनी प्रदर्शित केलेल्या व्हिडीओमध्येही त्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलय. शिवाय मराठी कलाकारही सोशल मिडीयाच्या माध्यमातून जागरुकता निर्माण करण्याचं आवाहन करत आहेत. 
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही तिच्या घरी बसून कुटुंबासोबत वेळ घालवतेय. घरात बसून सोनाली तिची कुकिंगची आवडही जोपासतेय. याविषयी पिपींगमून मराठीला माहिती देताना सोनाली म्हणते की, “मी घरात बसलेली आहे. ज्या पद्धतीच्या सुचना प्रशासनाने दिल्या आहेत त्या सुचनांचं पालन करत आहे. अनावश्यक कारणासाठी घरातून बाहेर पडत नाही, किंबहुना मी घरातच आहे. मी गेले आठवडाभर सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. मी अनेक गोष्टी पाहते, विविधं सिरीज, सिनेमे वैगेरे, मी पुस्तकं वाचतेय. मानसिक आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असल्याने काहितरी छान वाचतेय. मी कुकिंगही करतेय, मला बरेच दिवस कुकिंग शिकण्याचीही इच्छा होती पण तसा वेळ मिळत नव्हता. त्यामुळे मी नवनवीन पदार्थ बनवतेय. मी स्वत:ची काळजी घेतेय आणि माझ्या कुटुंबियांची काळजी घेतेय.”

लोकांनी घरात बसून स्वत:ची काळजी घेण्याच्या सुचना राज्य सरकारने केलेल्या आहेत. शिवाय या नियमांचं पालन करणही सध्याच्या परिस्थिती पाहता गरजेचं आहे. त्यामुळे सोनाली याविषयी सांगते की, “ आपल्या प्रशासनाने जी महत्त्वाची पावलं उचलली आहेत त्या सगळ्या नियमांचं पालन करा आणि त्यांना सहकार्य करा. जे आरोग्य कर्मचारी असतील किंवा जे घराबाहेर पडत आहेत आपल्यासाठी रिस्क घेत आहेत त्यांना ताण पडू नये म्हणून घरातून बाहेर पडू नका.”


येत्या 22 मार्चला देशात कर्फ्यू असल्याचं नुकतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषीत केलं आहे. शिवाय त्या दिवशी पाच वाजता डॉक्टर, मिडीया आणि जे कर्मचारी स्वत:चा विचार न करता काम करत आहेत त्यांचं कौतुकही घरात बसून करण्याचं आवाहन मोदींनी केलय. याविषयी सोनाली म्हणते की, “ 22 मार्चला जो जनता कर्फ्यू लागणार आहे त्यात देखील मी सहभाग घेणार आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी , सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील कर्मचारी ज्यांनी स्वत:ची काळजी न करता आपली काळजी घेतलेली आहे त्या सगळ्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी 22 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता मी देखील त्यांना धन्यवाद देणाऱ्या उपक्रमात सहभागी होईल. तुम्हीही सहभाग घ्या.”
बहुतांश कलाकार विविध पद्धतिने लोकांना जागरुक राहण्यासाठी या भयानक आजारापासून बचाव करण्यासाठी घरातच राहा आणि काळजी घ्या असं आवाहन करत आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून याविषयी आणखी जागरुकता निर्माण होत आहे.
 

Recommended

PeepingMoon Exclusive