By  
on  

सई ताम्हणकरची वेबसीरिज ‘डेट विथ सई'चा आला टिझर

अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच तिच्या पहिल्या-वहिल्या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. सई ताम्हणकरच्या ह्या वेबसीरिजचे फस्ट लूक पोस्टर आऊट झाल्यावर आता टिझरही आऊट झालाय.

झी5वर डिसेंबरपासून सुरू होणा-या ह्या वेबसीरिजविषयी सध्या खूप उत्कंठा आहे. ही मराठीतली पहिली थरार मालिका असणार आहे. ह्यामध्ये सई स्वत:च्याच म्हणजेच सई ताम्हणकरच्याच भूमिकेत असेल. सई ही पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे, जी वेबसीरिजमध्ये स्वत:च्याच भूमिकेत दिसेल.

टिझर पाहिल्यावर लक्षात येतंय की, ह्या वेबसीरजमध्ये सईचा वेडसर फॅन तिचा पाठलाग करत असतो. जो सईच्या नकळत तिचे चित्रीकरण करत असतो. ही थरारक वेबसीरिज पाहताना तुमच्या अंगावर काटा येईल, असा विश्वास निर्मात्यांकडून व्यक्त केला जातोय.

सई ताम्हणकर ह्याविषयी सांगते, “डेट विथ सई सारखे थरारनाट्य मी कधीच केले नव्हते. त्यामूळे ही वेबसीरिज माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. एका फॅनचं तुमच्यावरच प्रेम कसं जीवघेणंही ठरू शकतं, त्याची अनुभूती देणारी ही वेबसीरिज आहे. वेबसीरिजच्या विश्वात डेट विथ सईने मी पाऊल ठेवत आहे. आणि डिसेंबरमध्ये येणा-या ह्या वेबसीरिजची मी खूप उत्सुकतेने वाट पाहत आहे.”

पहा, डेट विथ सईचा टिझर -

https://www.youtube.com/watch?v=LmIUnwe_Z-o

Author

Recommended

PeepingMoon Exclusive