तेजश्री प्रधान आणि कृतिका देव ह्या मराठी अभिनेत्रीही आता बॉलीवूडच्या वाटेवर

By  
on  

बॉलीवूडच्या रूपेरी पडद्यावर झळकावे, अशी इच्छा अनेक कलाकारांना असते. मराठी सिनेकलाकारांनाही बॉलीवूडच्या आसमंतात चमकण्याची इच्छा असते. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, अतुल कुलकर्णी, सई ताम्हणकर, वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, मृणाल ठाकूर अशी मराठी सिनेसृष्टीतून बॉलीवूडमध्ये गेलेल्या कलाकारांची मोठी लिस्ट आहे.

आता ह्या लिस्टमध्ये तेजश्री प्रधान, कृतिका देव आणि भुषण प्रधान ह्या तीन मराठी कलाकारांचाही समावेश झाला आहे. सीमी जोसेफ लिखीत-दिग्दर्शित 'अन्य' ह्या बॉलीवूडपटात अतुल कुलकर्णी, भुषण प्रधान, प्रथमेश परब, वैभव तत्त्ववादी, तेजश्री प्रधान, कृत्तिका देव अशी मराठी कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळणार आहे.

नुकताच ह्या सिनेमाचा टिझर युट्यूबवर लाँच झाला. 'दृष्यम' आणि 'खजूर पे अटके' ह्या सिनेमांनंतर प्रथमेश परबचा हा तिसरा बॉलीवूडपट असेल. तर हंटर, बाजीराव मस्तानी, लिपस्टिक अंडार माय बुरखा आणि मणिकर्णिकानंतर वैभव तत्ववादीची ही पाचवी हिंदी फिल्म आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पहा ह्या सिनेमाचा टिझर

https://www.youtube.com/watch?v=Hd_vUxkSG_k

 

Recommended

Loading...
Share