वाढत चाललेला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता जे सध्या घरात बसले आहेत त्यांच्याकडे स्वत:साठी बराच वेळ आहे. ज्यांना वर्क फ्रॉम होमही नाही त्यांना घरात बसून करण्यासाठी बरेच पर्याय आहेत. त्यातच सर्व प्रकारचे मनोरंजन विश्वातील शुटिंगही बंद असल्याने कलाकार घरातच वेळ घालवत आहेत. कुणी पुस्तक वाचतय, कुणी त्यांची संगीताची आवड जोपासत आहे तर कुणी फिटनेसकडे आणखी लक्ष देत आहे.
सतत शुटिंगमध्ये व्यस्त असलेल्या कलाकारांना सध्या वेळ मिळाल्याने ते घरात बसून त्यांच्या कुकिंगची आवडही जोपासत आहेत.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला कुकिंगची फारशी आवड नाही. मात्र आता सध्या घरात बसून कुकिंग शिकत आहे. याविषयी सोशल मिडीयावर सांगताना सोनाली म्हणते की, “आईच्या हाताचा राजमा चावला नाही तर आता माझ्या बकेटलिस्टमधील गोष्टींची ही वेळ आहेत. मला माझ्या आईच्या कुकिंगचा कायम मोह होता. मला कधीच कुकिंगची किंवा कुकिंग शिकायची आवड नव्हती. मला असं वाटतय आता ही माझी कुकिंग शिकायची योग्य वेळ आहे दहा दिवस सेल्फ आयसोलेशनमध्ये असताता मी विविध पदार्थ बनवतेय. साधं वरण-भात, पोहे, सलाड पासून पालक पनीर, मटर पनीर आणि राजमा चावल हे पदार्थ मी बनवले आहेत.” सोनालीने फक्त या पदार्थांची यादी पोस्टमध्ये लिहीली नाही तर तिने बनवलेल्या पदार्थांचे फोटोही तिने पोस्ट केले आहेत.
तर बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री स्मिता गोंदकरही घरात बसून तिच्या कुकिंगची आवड जोपासत आहे. नुकताच स्मिताने तिचा कुकिंग करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. स्मिताने मुग डाळ खिचडी बनवली आहे. ती कशी बनवतात हेही तिने या व्हिडीओमध्ये दाखवले आहे.
p>
एकूणच घरातच बसावं लागल्याने या कलाकारांना स्वत:साठी वेळ देता येतोय. आणि म्हणूनच या वेळेचा असा सदुपयोग हे कलाकार करत आहे.