पाहा Photo : जुन्या आठवणींमध्ये रमली ही मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री

By  
on  

लॉकडाउनमधील क्वारंटाईनच्या या काळात घरात बसून या वेळेचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न बहुतांश लोकं करत आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकारही घरात बसून कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. तर काही त्यांचा छंद जोपासत आहेत. यातच घरात बसून काही जुन्या गोष्टींना उजाळा दिली जात आहे. घरात साफसफाई करत असताना जुन्या गोष्टी सापडत आहेत. 

मराठी अभिनेत्री आणि मराठी बिग बॉस फेम स्मिता गोंदकरही लॉकडाउनच्या काळात घरीच आहे. घरात कुकिंग करणं, साफसफाई करणं या सगळ्या गोष्टी ती करत आहे. मात्र याचवेळी  तिला काही जुन्या गोष्टी सापडल्या  आहेत. स्मिताला तिचे जुने, लहानपणीचे फोटो या निमित्तानं खण साफ करताना सापडले. मग काय तिने हे फोटो लगेचच सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. लहानपणापासूनच स्मिता विविध सांस्कृतीक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायची. याचचे हे फोटो आहेत. या निमित्ताने तिने या जुन्या आठवणींना उजाळा दिला  आहे.

सध्या सोशल मिडीयावर बऱ्याच कलाकारांचे जुने आणि लहापणीचे फोटो पाहायला मिळत आहेत. घरातच असल्याने या जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
 

Recommended

Loading...
Share