By  
on  

OMG ही आहे, प्रिया-उमेशची 'गुड न्यूज' !

मराठी सिनेसृष्टीतील मोस्ट लव्हेबल कपल प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडीने चार दिवसांपूर्वी आपण एक गुड न्यूज देणार असल्याचं चाहत्यांना इंस्टाग्रामवरुन एक क्यूट फोटो शेअर करत सांगितलं होतं. त्यामुळे प्रिया-उमेश यांच्याकडे छोट्या पाहुण्याची चाहूल लागलीय की काय अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण दरम्यान काही दिवसांपूर्वीच प्रियाने आपण उमेशसोबत  एका प्रोजक्टनिमित्ताने एकत्र येत असल्याचीही माहिती दिली होती. त्यामुळे ही नेमकी कसली गुड न्यूज हा प्रश्न सर्वांनाच सतावत होता.

पण अखेर यावरचा पडदा आता उलगडला आहे. प्रिया बापट लवकरच रंगभूमीवर एक नाटक सादर करतेय आणि पती उमेश कामत यात प्रमुख भूमिका साकारत असून या नाटकाचं नाव ' दादा एक गुड न्यूज आहे'. छोटा पडदा गाजवणारी 'फुलपाखरु' मालिका फेम प्रसिध्द अभिनेत्री ऋता दुर्गुळे या नाटकात महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत पाहायला मिळेल. प्रसिध्द दिग्दर्शक अद्वैत दादरकर या आगामी नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतोय. तर लेखन कल्याणी पाठारे यांचे आहे

निर्माती म्हणून या नाटकाबद्दल प्रियाने आपल्या इंस्टाग्रामवर नाटकाचं पोस्टर शेअर करत म्हटलंय," तर ही आहे आमची गुड न्यूज! आमची पहिली निर्मिती. खुप मनापासून, प्रेमाने जपलेली ही पहिली कलाकृती लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. आजपर्यंत अभिनेते म्हणून तुम्ही आमच्यावर खुप प्रेम केलंत तसंच आत्ता आमच्या या नव्या प्रवासात तुमचं प्रेम आणि आशिर्वाद मिळू देत"

https://www.instagram.com/p/Bq6RE85h0xi/

महत्त्वाचं म्हणजे मुंबईत दादा मी प्रेग्नेंट असल्याचे पोस्टरही ठिकठिकाणी लागले होते आणि प्रत्येकजण हेच कोडं उलगडण्याचा प्रयत्न करत होतो. आता पोस्टरचा अर्थ या नाटकानिमित्ताने उलगडला आहे. ही या नाटकाचीच जाहिरातबाजी होती. दरम्यान, या नाटकामध्ये अभिनेता उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे ही जोडी बहीण-भावाच्या रुपात दिसून येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive