सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात एका धमाकेदार पद्धतीने करणार आहे. ती यंदाचं न्यू इयर सेलिब्रेशन पॉंडीचेरी येथे करणार असंच तुम्हालासुध्दा वाटलं असेल ना. तर ती पॉंडीचेरी येथे वगैरा जात नाहीय तर मराठी सिनेइंडस्ट्रीतील तगड्या स्टारकास्टचा समावेश असलेल्या 'पॉंडिचेरी' या सिनेमाद्वारे ती प्रेक्षकांसमोर येणार आहे.
विशेष म्हणजे, या सिनेमाच्या निमित्ताने 'पॉंडिचेरी'चे दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्यासोबत ती पहिल्यांदाच काम करणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असून, सध्या ती त्याच्या स्क्रिप्ट रिडींगमध्ये व्यस्त आहे. थोडक्यात काय तर, नवीन वर्षाच्या अमृतमय स्वागतासाठी तिचे चाहतेदेखील उत्सुक झाले असतील, हे निश्चित !
पॉंडिचेरी सिनेमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा सिनेमा मोबाईल फोनवर चित्रीत करण्यात येत आहे.
https://www.instagram.com/p/BrejZxRFxh6/