आपल्या जवळच्या व्यक्तिला शेवटचा निरोप न देता आल्याची खंत प्रत्येकालाच असते. त्या व्यक्तिला गमावल्यानंतर त्या व्यक्तिला अखेरचा अलविदा करता न आल्याचं दु:ख वेदनादायी असतं. असचं दु:ख शेयर केलय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने. अप्सरा फेम सोनाली कुलकर्णी ही देखील लॉकडाउनमध्ये घरातच आहे. या लॉकडाउनमध्ये नवा पॉडकास्ट शो सुरु करत सोनालीने पॉडकास्ट क्षेत्रात पदार्पण केलय. 'सोनाली सांगते ऐका' असं या शोचं नाव आहे. या विविध एपिसोडमध्ये सोनाली तिच्या आयुष्यातील विविध गोष्टींचे खुलासे केले. मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तिच्या पॉडकास्ट एपिसोडमध्ये एका जवळच्या व्यक्तिविषयी बोलत असताना सोनालीला रडू कोसळलय. या भागात सोनाली तिच्या एका जवळच्या मैत्रिणीविषयी सांगत आहे.
तिच्याविषयी बोलत असताना सोनाली भावूक झाली. ती रडत रडतच हे पॉडकास्ट रेकॉर्ड करत असल्याचं ऐकू येतय. त्याचं कारण म्हणजे सोनालीची ही जवळची मैत्रीण आता या जगात नाही. मात्र तिच्या आठवणींनी सोनालीला भावूक केलय. त्या मैत्रिणीला शेवटचं न भेटता आल्याचं, तिच्याशी शेवटचं बोलता न आल्याचं दु:ख सोनालीला आहे. शेवटची भेट भांडणाने झाली असल्याने त्याच दु:ख तिला जास्त आहे. सोनालीच्या या मैत्रिणीचं काही वर्षांपूर्वी एका अपघातात निधन झाल होतं. मात्र तिच्या जाण्यानं सोनालीला मोठा धक्का बसला होता. याविषयी तिने या पॉडकास्टमध्ये सांगीतलं आहे. मात्र ते सांगत असताना सोनालीला अश्रू अनावर झाले.
सोनालीने हे दु:ख शेयर केलं असलं तरी नेहमी हसत खेळत बोलणाऱ्या या अभिनेत्रीच्या आयुष्यातील ही गोष्ट ऐकून तिच्या चाहत्यांचेही डोळे पाणावले असतील. मात्र जेव्हा आपण आपल्या जवळच्या व्यक्तिला भेटतो, बोलतो तेव्हाची शेवटची आठवण ही चांगली आणि आनंदी असली पाहिजे असं या पॉडकास्टमध्ये सोनाली सांगून जाते.