By  
on  

‘चला हवा येऊ द्या’च्या थुकरटवाडीत 'सिंबा'ची धमाकेदार एन्ट्री

अवघ्या महाराष्ट्राला आपल्या निखळ विनोदांनी खळखळून हसायला लावणा-या चला हवा येऊ द्या कार्यक्रमाची ख्याती गेली अऩेक वर्ष सर्वदूर पसरली आहे. फक्त मराठी सिनेमे आणि कलाकारच नाही तर अवघ्या बॉलिवूडलाही त्याने वेड लावले आहे. आता या चला हवा येऊ द्याच्या थुकरटवाडीत नुकतीच 'सिंबा' म्हणजेच रणवीर सिंहने धमाकेदार एन्ट्री करत सर्वांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडल्याचं दिसतंय.

झी मराठीच्या अधिकृत फेसबुक पेजवर रणवीर सिंहच्या डान्स परफॉर्मन्सचे दोन व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. यापैकी एक 'रामलीला' सिनेमातलं 'तडतडवर... ' गाण्यावर तो थिरकलाय तर दुस-या व्हिडीओत तो 'पद्मावत' सिनेमातील 'हबीबी....' गाण्यावर त्याने जबरदस्त ठेका धरलाय . एका व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘लवकरच भेटूया 'सिंबा'ला थुकरटवाडीत’ तर    दुस-यात 'थुकरटवाडीत सिंबाची Entry..!!' असं कॅप्शन आहे. रोहीत शेट्टीच्या 'सिंबा'त अनेक मराठी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्यापैकी वैदही परशुरामी, सिध्दार्थ जाधव, सुचित्रा बांदेकर यांच्या व्यक्तीरेखांचा उल्लेख करावा लागेल. त्यामुळे रणवीरसह 'सिंबा'ची संपूर्ण टीम थुकरटवाडीत हजर होती अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

https://www.facebook.com/zeemarathiofficial/videos/304116806887942/

रोहीत शेट्टी दिग्दर्शित  'सिंबा' येत्या 28 ऑगस्ट 2018 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे 'सिंबा' टीमने झी मराठीच्या लोकप्रिय ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचा यावर्षातील शेवटचा भाग गाजणार एवढं मात्र नक्की!

https://www.facebook.com/zeemarathiofficial/videos/412222295983981/?__xts__[0]=68.ARB0Z1WVAn_76lCI4JCH1IgnHjIQW2R9MDky2DzK1sdRkUGynT_Hp8V-CKBDshy-Zs3jbM3a0BgG-QGMaZFyj359ti7t5feOfoleO1fELqDdxXlEZ8bxMcOGurqNkXMWEaLDKnipQ5hS-oy3fF6NhaMplirS2qwj9F30CjhyRKs4xtjBekmDHoFhIezP071Fy_898cIlkQTg_HftyRKI6IVkCaC8_zzLLTxkeMbnVCjDPEYGTaithYwJDzdL4NOSYCvIN7SgPMMv0UHGNo3k6Zw-tkWPwmJpRfyu1JVWCGfDnvaU-tOytyysxiat0FDpQppy4Yed86tj7UH7tIa4DBjGLA8&__tn__=-R

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive