आपल्या विनोदी सादरीकरणाने प्रेक्षकांना दु:ख विसरून हसायला लावणारे थुकरटवाडीकर एका नवीन पाहुण्याच्या मानपानात गुंतले आहेत.
हा पाहुणा आहे सिंबा अर्थात रणवीर सिंग. रणवीर सिंबाच्या प्रमोशनसाठी थेट थुकरटवाडीत पोहोचला आहे. आल्या-आल्या रणवीरने डान्सा परफॉर्मन्स देऊन सगळ्यांना खुष केलं आहे. त्याने रामलीला, पद्मावत या सिनेमातील गाण्यांवर डान्स केला आहे. या परफॉर्मन्सने थुकरट्वाडीकरांची मनं जिंकली आहेत. पण त्यांनीही रणबीरला एका सरप्राईज देऊन खुष केलं आहे.
हे सरप्राईज आहे कुकर. होय. थुकरट्वाडीकरांनी या नवरदेवाचा चांगलाच मानपान केला.
थुकरट्वाडीचे आबा कुशला बद्रिके यांनी दिपिका आणि रणवीर या नवदांपत्याच्या संसाराला हातभार म्हणून कुकरचा आहेर केला. याशिवाय रणवीरला टॉवेल, टोपी, श्रीफळ आणि शर्ट्पीस, पॅंट्पीस असा भरघोस आहेर केला आहे.
थुकरटवाडीकर या नव्या नवरोबावर भलतेच उदार झालेले दिसतात. आता या नव्या कुकरमध्ये दिपिका वहिनी स्वयंपाक करतात का ते लवकरच कळेल.
रोहीत शेट्टीच्या ‘सिंबा’त अनेक मराठी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्यापैकी वैदही परशुरामी, सिध्दार्थ जाधव, सुचित्रा बांदेकर यांच्या व्यक्तीरेखांचा उल्लेख करावा लागेल. त्यामुळे रणवीरसह ‘सिंबा’ची संपूर्ण टीम थुकरटवाडीत हजर होती .
https://twitter.com/zeemarathi/status/1075751867525718022