By  
on  

  आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवासाला क्रांती रेडकरने हे जुने फोटो केले पोस्ट

या लॉकडाउन काही लोकं आपल्या परिवारासोबत आहेत तर काही परिवारापासून दूर आहेत. वाढत जाणारा लॉकडाउनचा कालावधी  कुटुंबापासून दुर असणाऱ्यांसाठी प्रचंड दु:खाची बाब आहे. 
अभिनेत्री क्रांती रेडकरही तिच्या परिवारापासून या दरम्यान लांब आहे. तिला तिच्या आई – वडिलाची प्रचंड आठवण येत आहे. त्यातच आई – वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसालाही त्यांना भेटता येत नसल्याने ती दु:खी आहे. मात्र तरिही तिने सोशल मिडीयावर खास पोस्ट करत तिच्या आई-वडिलांच्या या नात्याविषयी सांगीतलं. शिवाय या पोस्टमध्ये क्रांतीने तिच्या आई-वडिलांसोबतचे तिचे लहानपणीचे जुने फोटोही पोस्ट केले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Marriage is like tea, if you let it brew long enough the flavour is fantastic. ( it’s a líne from one of my plays) it is so applicable and so true. Happy 54th wedding anniversary mummy pappa.. you are the best parents anyone can ever ask for . You taught us to fly . You believed in us and supported us in whatever we did. Today it’s been 54 years that you both are together. For today’s couples it looks like a dream. Like every other couple you fight , bicker you irritate each other but in the end I have never seen two people who are so madly in love with each other , who value each other’s existence and who realise the one is incomplete without the other one and vice versa .. there is so much to learn from you patience , sacrifice and immense dedication towards the relationship. It’s so sad that we can’t be together today like every year, but I am praying that soon this thing should get over and we be reunited . This is the longest that we all have not been together . But as Pappa says “it’s just time .. and time changes” I love you both over my life . @hridayabhhinay @sanjanawavhal @saniawavhal20 @genr8_

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar) on

क्रांती या पोस्टमध्ये लिहीते की, “लग्न हे चहासारखे असते. माझ्या एक नाटकात याविषयी एक लाईनही होती. 54व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या मम्मी पप्पा तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही माझ्यासाठी सर्वोत्तम पालक आहात. मला खूप वाईट वाटतय की आपण आज दरवर्षीप्रमाणे सोबत नाही आहोत. पण लवकरच हे सगळं संपल्यानंतर आपण लवकरच भेटू. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या कालावधीसाठी आपण सगळे एकमेकांपासून दूर आहोत. पण पप्पा जसं म्हणतात तसं “की ही फक्त एक वेळ आहे आणि वेळ बदलत असते.”  असं म्हणत क्रांतीने तिच्या आई-वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive