By  
on  

सज्ज व्हा पुन्हा ‘सैराट’ व्हायला, लवकरच येतोय सिक्वल

संपूर्ण महाराष्ट्रासह अवघ्या बॉलिवुडलाही याड लावणा-या नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ सिनेमाचा सिक्वल लवकरच येतोय. आर्ची, परशा या सिनेमातील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अजूनही त्यांची जादू कायम आहे. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. सिनेमात आर्चीची बिनधास्त भूमिका साकारणा-या रिंकू राजगुरुला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार नागराज मंजुळेंच्या इतिहास घडवणा-या ‘सैराट’ सिनेमाचा सिक्वल येतोय. पुण्यात ‘सैराट 2’च्या शिर्षकाची नोंदणी झाली असून चित्रीकरणालासुद्धा सुरुवात झाल्याचे समजते. सिनेरसिकांनी डोक्यावर घेतलेली ही आर्ची परशाची गावरान हटके लव्हसेटोरीचा सिक्वल येतोय म्हटल्यावरचाहत्यांमध्ये आनंदाला उधाण आलं आहे. पण अद्याप या सिक्वलची अधिकृत घोषणा झालेली नाही.

या दुस-या भागाची कथा काय असणार याबाबत देखील त्यांनी माहिती दिली आहे. जिथे पहिल्या भाग संपतो, तिथूनच दुस-या भाग सुरु होणार आहे. आर्ची आणि परशाचा मुलगा मोठा झाल्यानंतरची ही कथा असणार आहे, असे त्यांच्या वृत्तात म्हटले आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive