लॉकडाउनच्या काळात बहुतांश लोक घरात बसून फिटनेससाठी योगा आणि वर्कआउट करत आहेत. अभिनेत्री नेहा पेंडसेही स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जीम वर्कआउट करते. तिनं काही वर्षांमध्ये स्वत:ला व्यवस्थित फिट ठेवलेलं आहे. मात्र सध्या घरात बसून नेहा ही आता योगाकडे वळली आहे. नेहा पेंडसेने नुकताच एक व्हिडीओ तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत नेहा योगाचे आसन करताना दिसतेय. शिवाय हे आसन केल्यानंतर ते व्यवस्थित झाल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसतय. आणि हे आसन झाल्यावर ती आनंदाने नाचतानाही दिसतेय.
ती या पोस्टमध्ये लिहीते की, “एकावेळी एक पाऊल पुढे टाकतेय. नेहमीच योगा करायची इच्छा होती पण कुठूनही प्रेरणा मिळत नव्हती. लॉकडाउन आणि घरात असल्याने मला सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ मिळाली. योगा हे अतिशय कठीण आहे. आणि मला वाटतय की गेल्या काही दिवसात मी माझा कोपर आणि काही स्नायू चांगलेच ताणले आहेत. पण जीम वेडे समजूच शकतील की यात काय समाधान असतं ते. मी जाहीर करते की योगाची एडवान्स लेव्हल दररोजच्या सरावाने आणि चिकाटीने मी ते साध्य करेल.”
असं म्हणत नेहाने सध्या सुरु असलेलं तिचं योगा प्रेम तिच्या चाहत्यांना सांगीतलं. लवकरच नेहाचे आणखी काही असे प्रेरणादायी योगा व्हिडीओ पाहायला मिळतील यात शंका नाही.