By  
on  

शाळेच्या पहिल्या दिवशी अजीबात रडली नव्हती ही अभिनेत्री, शेयर केली शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण

लॉकडाउनमध्ये सध्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. त्यातच मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांचे थ्रोबॅक फोटो शेयर करत आहेत. 
अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही तिचे थ्रोबॅक फोटो सध्या शेयर करतेय. तिच्या लहानपणीचे, शुटिंग दरम्यानचे असे जुने फोटो तिने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केले आहेत. यातच तिने तिचा लहानपणीचा आणखी एक गोंडस फोटो शेयर केला आहे. हा फोटो आहे तिच्या शाळेतल्या पहिल्या दिवसाचा हा फोटो पोस्ट करत ती या पोस्टमध्ये लिहीते की, “होय, ही मीच आहे. खूप दिवस झाले हा फोटो मलाच पाठवला जात होता, हा माझाच आहे का विचारत. आणि हा आठवडा भर मी थ्रोबॅक फोटो टाकतीये, म्हणून म्हटलं पोस्टच करुन टाकूया. तर मग, हा माझा शाळेतला पहिला  दिवस. पण मला आठवत नाही. माझी आई म्हणते की मी आनंदी होते आणि रडले सुध्दा नाही. तुम्हाला आठवतोय का तुमचा शाळेतला पहिला दिवस ? ही खरतर शाळा सुरु होण्याची वेळ आहे पण य़ा परिस्थितीत लहान मुलं शाळेत कधी जातील ? आणी सगळं पुन्हा तसच असेल का ?”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Yes, this is ME. खूप दिवस झाले हा photo मलाच पाठवला जात होता, हा “माझाच आहे का” विचारत आणि हा आठवडा भर मी #throwback #pictures टाकतीये, म्हणून म्हंटलं पोस्टच करून टाकूया... तर मग, हा माझा “शाळेतला पहिला दिवस” #firstdaytoschool Of course, I don’t remember, but my mother says I was happy OK go school, I didn’t cry a tear but I frowned(zoom in to see) तुम्हाला आठवतोय का तुमचा शाळेतला पहिला दिवस? P.S. usually it’s time for schools to reopen next week! #newterm #newyear When will kids go back to school ️ And will it be the same again

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

असं लिहीत सोनालीने तिच्या शाळेतल्या पहिल्या दिवसाची आठवण सांगीतली आहे. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive