By  
on  

स्वत:चा फोटो पाहून हा अभिनेता झाला आश्चर्यचकित, म्हणतो “आरसा खराब आहे का ?”

लॉकडाउनमध्ये सध्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. यातच मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांचे थ्रोबॅक फोटो पोस्ट करत आहेत.
भारदस्त आवाज आणि उत्तम शरीरयष्ठी असलेला अभिनेता शरद केळकरनेही त्याच्या थ्रोबॅक फोटो पोस्ट केला आहे. 

शरदने त्याचा एक शर्टलेस फोटो पोस्ट केला आहे. मात्र हा फोटो पाहून शरदला आश्चर्याचा धक्का बसला आहे. शरदचा फिट लूक या फोटोत पाहायला मिळतोय. मात्र शरदा या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहीतो की, “हा आरसा खराब आहे की मी खरच एवढा फिट होतो ? ”

अशी मजेशीर पोस्ट शरदने केली आहे. त्याचा हा फिट लूक पाहुन त्यालाच विश्वास बसेना की हे आपणच आहोत. अर्थात लॉकडाउनमध्ये घरात राहून शरद त्याच्या फिटनेसची काळजी घेतच असेल. मात्र हा थ्रोबॅक फोटो पाहून त्याला त्याच्या या फिट लुकची आठवणी झाली आहे.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive