आपलं लहानपण हे कायम आठवणींचा साठा असतो. या आठवणी हळूहळू धुसर होत असल्या तरी त्या आठवणी आनंद देऊन जातात. सध्याच्या लॉकडाउनच्या आणि कोरोनाग्रस्त परिस्थितीत घरात बसलेल्या बहुतांश लोकांना त्यांचं लहानपण आणि जुन्या आठवणी आठवत आहेत.
अभिनेता श्रेयस तळपदेलाही त्याच्या लहानपणीचे दिवस आठवत आहेत. आणि म्हणूनच त्याने त्याच्या लहानपणीचा मजेशीर फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये श्रेयसच्या हातात बंदूक पाहायला मिळतेय. आणि खेळण्यातली ही बंदूक हातात मिरवतानाचा त्याचा हा फोटो आहे. श्रेयसने या पोस्टला मजेशीर कॅप्शन दिलं आहे. श्रेयस तळपदे या पोस्टमध्ये लिहीतो की, “ओळखा कोण, लहानपणी पाहिलं होतं, बंदूक घेऊन फिरायचा. छोटी चड्डी घालायचा, खूप खट्याळ होता.”
असं म्हणत श्रेयसने त्याचाच फोटो पोस्ट करत याला ओळखलत का ? असं विचारलं. नेटकऱ्यांना श्रेयसचा हा फोटो भलताच आवडलाय. या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.