By  
on  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला येत आहे या गोष्टीची प्रचंड आठवण

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लॉकडाउनच्या आधीपासूनच फियान्से कुणाल बनोडेकरसोबत दुबईत आहे. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून दुबईत असलेली सोनाली सध्या बऱ्याच गोष्टी मिस करत आहे. इतके दिवस घरापासून दूर असलेल्या सोनालीला बऱ्याच गोष्टींची आठवण येत आहे. याविषयी सोनालीने पोस्ट करूनच भावना व्यक्त केली आहे.

'हिरकणी' हा सिनेमा सोनालीसाठी खास ठरलाय. या सिनेमात हिरकणी साकारतानाचा प्रवास, सिनेमाचं प्रमोशन या सगळ्या आठवणी तिच्यासाठी अविस्मरणी आहेत. या सिनेमाला प्रेक्षकांचं आणि चाहत्यांचं मिळालेलं प्रेम तिच्यासाठी खास आहे. आणि याच गोष्टींची सोनालीला सध्या प्रचंड आठवण येत आहे. याविषयी सांगताना तिने तिचा एक  फोटो पोस्ट केला आहे.

 

या पोस्टमध्ये सोनाली म्हणते की, "साडी आणि साज़ खूप मिस करतेय.. हिरकणी तुला खूप मिस करतेय.आणि हे फोटोज ज्या घरी काढलेयत,ते माझं पुण्याचं घर, खूप मिस करतेय." असं म्हणत तिने या भावना व्यक्त केल्या आहेत.

मात्र सध्या दुबईत सुखरूप असलेली सोनाली लवकरच सध्याची कोरोनाग्रस्त परिस्थिती पुर्ववत झाल्यावर तिच्या मायदेशी परतेल एवढं नक्की. मात्र चाहते तिला  भेटण्यासाठी आसुसले असणार एवढं नक्की.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive