पाहा Video : शनू बेबीने अशा दिल्या मम्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा

By  
on  

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेता शनायाची भूमिका साकारणाऱ्या रसिका सूनीलची एक्झिट झाल्यावर अभिनेत्री ईशा केसकर तिच्या जागी आली. ईशानेही ही भूमिका उत्तमरित्या साकारली. या मालिकेत शनायाची आई साकारली आहे अभिनेत्री किशोरी अंबिये यांनी. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावर त्यांच्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

 

ईशा केसकरनेही तिच्या ऑनस्क्रिन आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ईशाने एका खास व्हिडीओच्या माध्य़मातून किशोरी यांना शुभेच्छा दिल्या. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ईशा लिहीते की, "शनू बेबी ही तिच्या मम्माशिवाय अपूर्ण आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप प्रेम किशू ताई."

या व्हिडीओतून ऑनस्क्रिन आई-मुलीची भूमिका साकारणाऱ्या या दोन अभिनेत्रींमध्ये असलेली ऑफस्क्रिन मैत्री पाहायला मिळतेय.

Recommended

Loading...
Share