अभिनेत्री क्रांती रेडकरने तिच्या वडिलांचा वाढदिवस नुकताच साजरा केला आहे. वडिलांचा हा 80 वा वाढदिवस साजरा करतानाचे फोटो क्रांतीने पोस्ट केले आहेत. शिवाय वडिलांचा जुना फोटोही तिनो यासोबत जोडला आहे. वडिलांचा हा ब्लॅक एन्ड व्हाईट हँडसम फोटोही चाहत्यांना आवडला असल्याचं या पोस्टच्या कमेंट्समध्ये पाहायला मिळतय.
या पोस्टमध्ये क्रांती लिहीते की, “या माणसाच्या सेलिब्रेशनची संध्याकाळ... माझे बेस्ट फ्रेंड माझे वडिल. माझं तुमच्यावर प्रेम आहे पप्पा. विश्वास बसत नाही की तुम्ही 80 वर्षांचे झालात. जर वय हद्याच्या भावनांनी मोजता आलं असतं तर कदाचित तुम्ही आता 16 वर्षांचे असता. लव्ह यू डॅड.. खूप गोष्टी आहेत या मी तुमच्याकडून शिकतेल आणि अजूनही शिकतेय. तुम्ही असण्यासाठी धन्यवाद. वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा आणि आणखी पाहायचय.”