अभिनेत्री समिधा गुरुच्या घरातली ही जागा म्हणजे परिकथेतलं परीराज्य

By  
on  

प्रत्येकाच्या घरात एक अशी जागा असते त्या जागेविषयी विशेष आपुलकी असते. जर कुणाच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांची खोली तर उत्साहाने भरलेली, सकारात्मक ऊर्जा देणारी असते. अशीच एक सुंदर खोली आहे अभिनेत्री समिधा गुरुची मुलगी दुर्वाची. य़ा खोलीतील एका खास जागेविषयी समिधा सांगते. ही जागा समिधाला परिकथेतील परीराज्यासारखी वाटते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आमच्या घरातली ही जागा म्हणजे परिकथेतल परीराज्य आहे .. ह्या राज्यातआहे फक्त आनंद, शांतता , निरागसता ... इथे बसलं की वाटत बालपण इथे गोठून जावं अगदी ह्या राज्याच्या नावाप्रमाणे "फ्रोझन वर्ल्ड " .. ह्या राज्यात कुणी वाईट नाही , कशासाठी फाईट नाही , मिळेल त्याचा आनंद आहे न मिळाल्याच दुःख नाही , कुणाचा मत्सर नाही द्वेष नाही की मनात कुणाविषयी राग नाही .. आमच्या ह्या परीराज्यात भरभरून प्रेम आहे ..आमच्या घरातली ही वात्सल्याची फ्रेम आहे .. #homesweethome #stayhome #stayhealthy #myfavcorner #myspace #myprincess #love #peaceful #blue #frozenworld

A post shared by Samidha Guru (@samidhaofficial) on

 

समिधाने नुकतच सोशल मिडीयावर काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो आहेत तिच्या मुलीच्या खोलीचे. मुलीसाठी खास सजवलेल्या खोलीतील ही जागा अतिशय सुंदर आहे. या जागेविषयी समिधाने अतिशय सुंदर शब्दांत लिहीलय. ती लिहीते की, "आमच्या घरातली ही जागा म्हणजे परिकथेतल परीराज्य आहे .. ह्या राज्यातआहे फक्त आनंद, शांतता , निरागसता ... इथे बसलं की वाटत बालपण इथे गोठून जावं अगदी ह्या राज्याच्या नावाप्रमाणे "फ्रोझन वर्ल्ड " .. ह्या राज्यात कुणी वाईट नाही , कशासाठी फाईट नाही , मिळेल त्याचा आनंद आहे न मिळाल्याच दुःख नाही , कुणाचा मत्सर नाही द्वेष नाही की मनात कुणाविषयी राग नाही .. आमच्या ह्या परीराज्यात भरभरून प्रेम आहे ..आमच्या घरातली ही वात्सल्याची फ्रेम आहे .."

 

Recommended

Loading...
Share