By  
on  

कुशल बद्रिकेने चार महीन्यांनी केली या गोष्टीला सुरुवात, केली गमतीशीर पोस्ट

सरकारच्या परवानगीनंतर नियमांचं पालन करत मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. विशेषकरून टेलिव्हीजन विश्वातील चित्रीकरण हळूहळू सुरु करण्यात आलय. येत्या 13 जुलैपासून टेलिव्हीजनवर नव्या भागांची पर्वणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 
'चला हवा येऊ द्या' विनोदी कार्यक्रमाचे जुने भाग मागील तीन ते चार महिने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झाल्याने आणि चित्रीकरण बंद असल्याने जुन्या भागांचे प्रसारण होत होते. मात्र नुकतीच या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. कलाकारही सेटवर पुन्हा येऊन आनंदी झाले आहेत. अभिनेता कुशल बद्रिकेने याचविषयी एक गमतीशीर पोस्ट सोशल मिडीयावर केली आहे.

या सेटवरील मेकअप आर्टीस्ट चक्क चार महिन्यांनी कुशलला मेकअप करत आहे. आणि मेकअप करतानाचा हा फोटो त्याने पोस्ट केला आहे. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करताना एकमेकांपासून अंतर ठेवून ही सगळी कामं केली जात आहे. तेव्हा मेकअप आर्टीस्टही तशाच पद्धतिने सोशल डिस्टंसिंग पाळून आणि सुरक्षिततेची काळजी घेत आहे. आणि पीपीई किट घालून मेकअप करत आहेत.या कॅप्शनमध्ये कुशल लिहीतो की, “आज ४ महीन्याने हा माझ्या चेहऱ्याला मेकअप करतोय, मेकअप करतोय का दिवाळीचा फटाका लावतोय काय माहीत.”

Author

Recommended

PeepingMoon Exclusive