प्रिया बापटला येत आहे या गोष्टीची आठवण, व्हिडीओ केला पोस्ट

By  
on  

सध्याच्या लॉकडाउनच्या काळात कोरोनाच्या भितीने घराबाहेर पडता येत नसल्याने बऱ्याच गोष्टींची आठवण येत आहे. यादरम्यान बऱ्याच गोष्टींना सगळेच मिस करत आहेत. याला मनोरंजन विश्वातील कलाकारही अपवाद नाहीत. सध्या मालिकांच्या चित्रीकरणाला आणि इतर कामाला सुरुवात झाली आहे. मात्र काही कलाकार अजूनही घरातच आहेत. किंवा त्यांची इतर कामे मिस करत आहेत. 

अभिनेत्री प्रिया बापटलाही एका गोष्टीची खास आठवण येत आहे. ती सध्या तिच्या विविध फोटोशुट्सची मजा मिस करत आहे. तिला फोटोशुट दरम्यानच्या मजा मस्तीची आठवण येत आहे. आणि म्हणून या आठवणींमध्ये प्रिया रमली आणि तिने बनवला एक व्हिडीओ. या व्हिडीओत प्रियाने तिच्या काही निवडक फोटोशुट्सच्या आठवणी गोळा करून त्याचा एक व्हिडीओ तयार केला आहे. 

 

फोटोशुटसाठी तयार होणं, विविध पेहराव घालणं, पोझ देणं या सगळ्या गोष्टींची तिला आठवण येत आहे. म्हणूनच सोशल मिडीयावर तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये प्रिया लिहीते की,  "जेव्हा तुम्हाला तुमच्या फोटोशुट्सची, पोझेस, आणि ड्रेसींगच्या मजेची आठवण येते, तेव्हा तुम्ही काय करता ? तेव्हा तुम्ही जुन्या पोस्टचा व्हिडीओ बनवता"

अर्थात एका अभिनेत्रीची स्टार लाईफ प्रिया मिस करत असल्याचं चित्र पाहायला मिळतय.

 

 
 

Recommended

Loading...
Share