By  
on  

पाहा Photos : 'सहकुटुंब सहपरिवार'ला पुन्हा होत आहे सुरुवात, या अभिनेत्रीने शेयर केले सेटवरील हे फोटो

तीन ते चार महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर विविध मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. तेव्हा मागील काही महिने टेलिव्हीजनवर मालिकांचे जुने भाग आणि जुन्या मालिका हे चित्र बदलणार आहे. आजपासून मालिकांच्या नव्या भागांना सुरुवात होणार आहे. लॉकडाउनच्या आधी सुरु झालेली सहकुटुंब सहपरिवार या मालिकेचेही नवे भाग प्रेक्षकांना पाहता आले नाही.

मात्र आजपासून या मालिकेचेही नवे भाग प्रसारित होणार आहेत. त्यामुळे या मालिकेतील कलाकार प्रचंड आनंदी आहेत. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या नंदिता पाटकरने मालिकेच्या सेटवरील काही फोटो नुकतेच पोस्ट केले आहेत. मोठ्या कालावधीनंतर मालिकेच्या सेटवर पुन्हा कामाला सुरुवात केल्याचा आनंद या कलाकारांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आजपासून रोज आता पुन्हा आपली भेट होणार... संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाह वर. आम्ही येतोय "सहकुटुंब सहपरिवार" तुमच्या भेटीला.... तुम्ही ही तयार राहा "सहकुटुंब सहपरिवार" पाहायला विसरू नका "सहकुटुंब सहपरिवार" संध्याकाळी ७ वाजता स्टार प्रवाह वर #SahkutumbSahparivar #familytime #family #NewEpisodes #StarPravah #eveningshow #emotions #actorslife #lovemyjob #happiness #happyvibes #positivity #lifeisbeautiful #workisfun #secondhome @star_pravah @piyu_pk @sunilbarve @kishoriambiye @akash_nalawade1 @akashshinde_45 @amey_barve1212 @saksheemahesh0912_official @komal_gd @___bonsai.2207___ @santoshpatil2712 @sayaleesambhare

A post shared by Nandita Patkar (@mi_nandita) on

 

नंदिता या पोस्टमध्ये लिहीते की, "आम्ही येतोय "सहकुटुंब सहपरिवार" तुमच्या भेटीला.... तुम्ही ही तयार राहा "सहकुटुंब सहपरिवार"

या मालिकेच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून सेटवर विविध नियमांचं पालन होत आहे. कलाकार मास्क घालूनच सेटवर वावरत आहेत. या मालिकेत अभिनेता सुनील बर्वे आणि नंदिता पाटकर मुख्य भूमिकेत आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive