जिथे 'टी' तिथे मी, म्हणतोय अभिनेता स्वप्निल जोशी

By  
on  

सध्या लॉकडाउनच्या काळात कित्येकांना कुटुंबासोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळाली. कामाला सुरुवात झाली असली तरी काही अजूनही आपल्या परिवारासोबत घरात वेळ घालवत आहेत.

अभिनेता स्वप्निल जोशी देखील त्याची पत्नि, एक मुलगी, एक मुलगा या परिवारासोबत घरात वेळ घालवत आहे. चित्रीकरणात व्यस्त असलेला स्वप्निल सध्या कुटुंबासोबत एकत्र जेवण, एकत्र चहा करतोय. नुकताच स्वप्निलने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये स्वप्निल त्याच्या पत्निसोबत चहाचा आनंद लुटताना दिसत आहे. मात्र त्याच्या मजेशीर कॅप्शनने ही पोस्ट चाहत्यांना प्रचंड आवडलेली दिसतेय.

या पोस्टमध्ये स्वप्निल लिहीतो की, "जिथे TEA, तिथे मी!" तेव्हा या पोस्टमधून स्वप्निलचं चहाविषयीचं प्रेम पाहायला मिळतय. शिवाय बालकनीमध्ये पत्निसोबत बसून चहा पित स्वप्निल पावसाळ्याचा आनंद लुटत आहे.

त्याच्या चाहत्यांना हा फोटो इतका आवडला की काही तासातच या फोटोवर हजारो लाईक्सचा वर्षाव झाला आहे.

Recommended

Loading...
Share