विचित्र स्वप्नं, चिंता, भितीने ग्रासलेल्या प्रिया बापटसाठी आजची सकाळ ठरली फ्रेश

By  
on  

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनचा हा काळ कित्येकांसाठी कठीण जात आहे. काहींना तर घरात बसून चिंता आणि भिंती सतावत आहे. अभिनेत्री प्रिया बापटच्या बाबतीतही असचं होत आहे. मात्र या गोष्टींवर प्रिया मात करताना दिसत आहे. नुकतच प्रिया बापटने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सकाळी धावण्यासाठी घराबाहेर पडलेली प्रिया पाहायला मिळतेय. प्रिया तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेत असते. त्यासाठी ती व्यायाम आणि धावणं हे करत असते. 

या पोस्टमध्ये तिने सध्या तिच्यासोबत घडणाऱ्या गोष्टींविषयी सांगीतलं आहे. रात्री झोपताना विचित्र स्वप्नं, चिंता आणि भितीने प्रियाला ग्रासलं असल्याचं ती यात म्हणते. मात्र आजची सकाळ तिच्यासाठी फ्रेश ठरली असल्याचं सकारात्मक चित्रही ती समोर मांडते.

 

ती लिहीते की,  "आज खूप दिवसांनी मी सकाळी कोणत्याही अलार्मशिवाय 5 वाजून 45 मिनीटांनी उठले. शिवाय काल रात्री मी विचीत्र स्वप्न, चिंता किंवा कोणत्याही भितीशिवाय व्यवस्थित झोपल्याची ही लक्षणं आहेत.  मग मला सकाळी धावण्यासाठी जावच लागलं कारण मला आज सकाळी फ्रेश वाटत होतं.  आणि ्त्या 45  मिनीटांच्या घराबाहेरील वर्कआउटने आणखी आनंद भरला. परिवाराच्या आधाराने चांगली पुस्तके आणि धावणं (वर्कआउट) या दोन गोष्टींनी या कठीण समयी मला सतत पुढे जात ठेवले."

विचित्र स्वप्नं, चिंता आणि भितीमुळे रात्रीची नीट झोप होत नसल्याचही ती यात सांगते.  विविध पुस्तकं वाचणं आणि धावणं किंवा वर्कआउट करणं या गोष्टी सध्या प्रिया करत आहे. त्यामुळेच तिला सध्याच्या या कठीण समयी सकारात्मकता मिळत असल्याचही ती या पोस्टमध्ये सांगते. 

Recommended

Loading...
Share